१६ ऑक्टोबर २०२३ ला तेलंगणामधल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती, इच्छुक उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते घोषणा देत होते, रेवंथ हटाओ, काँग्रेस बचाओ. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनीतिकीट वाटपात भ्रश्टाचार केला, आपल्या मर्जीतल्या लोकांना तिकिटं दिली, त्यांच्यावर ईडी लावा असे कित्येक आरोप झाले.

आता कट टू, ३ डिसेंबर २०२३, तेलंगणामधल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होती, उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते घोषणा देत होते, रेवंथ अण्णा, सीएम सीएम. कारण रेवंथ रेड्डीनी गेम फिरवला होता. हा व्हिडीओ करेपर्यंत तेलंगणामध्ये काँग्रेसनं ६३ ते ७० जागांवर आघाडी घेत, बहुमताच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केलीये.Telangana Result2023: KCR यांच्या साम्राज्याला धक्का देणाऱ्या Congress Leader Revanth Reddy यांचा इतिहास काय ?पण या निवडणुकांआधी केसीआर राष्ट्रीय नेते होण्याच्या दिशेनं पावलं टाकत होते, महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांची पॉवर ठळकपणे दिसून येत होती, साहजिकच केसीआर यांना हरवणं सोपं नव्हतं, त्यांच्याविरोधात एक चेहरा देण्याची डेरिंग कोणीही करत नव्हतं, पण एक माणूस नुसता डेरिंग करण्यावर थांबला नाही, त्यानं मॅच केसीआर विरुद्ध आपण अशी लावली आणि वनसाईड जिंकलीही. हा माणूस अर्थातच तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी. काँग्रेसच्या टप्प्यात नसलेला हा कार्यक्रम करणारे रेवंथ रेड्डी आहेत कोण ? त्यांनी मॅच फिरवली कशी ? त्यांच्या विषयी वाचूयात या आजच्या ब्लॉग मध्ये .

रेवंथ रेड्डी ह्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली?
काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार चर्चेत असलेले रेवंथ रेड्डी च्या राजकारणाच्या सुरुवात भाजपाचे संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून झाली. नंतर ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले. त्याचवेळी त्याचं कनेक्शन जोडले तेलगू देसम चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत मग त्यांनी टी डी पी मध्ये एन्ट्री केली. 2014 त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. आणि पाच टर्म निवडून आलेल्या गुरुनाथ रेड्डी यांना हरवून त्यांन्ना जायंट किलर म्हणून जनता ओळखू लागली.
2014 ला पुन्हा ते आमदार झाले आणि पक्षाचे पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झाली. आणि 2015 मध्ये त्यांना वोट फॉर कॅश या प्रकरणात अटक झाली. मुलीच्या लग्नाचा एकच दिवस मग त्यांना जेलमधून सोडण्यात आलं. पण त्यांनी ती मुव्हमेंट परफेक्ट कॅच केली. आणि त्यांच्या मागे सहानुभूती होती आणि कार्यकर्त्यांची फळी होती. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची डेरिंग पण त्यांच्यात होती. डेरिंग त्यांनी दाखवली 2017 मध्ये टीडीपीला सोडचिट्टी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एक तर राज्यात केस यांचा पूर्ण होत होता आणि सर्व पावर त्यांच्याकडे होती. टीडीपी पेक्षा काँग्रेस जास्त बॅकफूट वर होती.पण रेवंथ रेडी यांचा प्लान पक्का होता.त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन संघटना बांधायला सुरुवात केली.
त्यांच्यापैकी एक त्यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. आणि 2018 ला अचानक निवडणूक लागल्या आणि त्यांनी निवडणुकीत दंड थोपटले. त्यांनी पून्हा कोडंगल मतदारसंघातून अर्ज दाखल केला.राज्यभरात काँग्रेसला बुस्टर देऊ तू हे के सी आर यांनी वेधले. आणि कोडंगल मध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं. रेड्डी यांचा 9000 मतांनी पराभव झाला. आणि केसीआर यांनी एक बाजी जिंकली. पण रेवंथ रेड्डी गप्प बसणारे नव्हते.संघटन कौशल्य वकृत्व आणि रणनीती या तिन्ही गोष्टी त्यांच्या पक्क्या होत्या. यांच्या खतरनाक पावर असलेल्या शक्तीचा सामना करायचा असेल तर आपल्याकडे पण मोठी पावर असावी असे त्यांना वाटले. 2019 ला ते निवडणुकीत उभे राहिले. आमदारकीला नऊ हजार मतांनी हरलेला माणूस खासदारकीला 10हजार मतांनी चौरंगी लढतीत निवडून आला. याचा अर्थ त्यांनी बाजी जिंकलेली नव्हती. के सी आर तेलंगणाचे सिंगल हॅन्ड सुप्रीम होते. सत्ता स्थानाला धक्का लावावे असे अशक्य वाटत होते. खरंतर रेवन्थ रेड्डी वर काँग्रेस नेत्यांचा ,कार्यकर्त्यांचा रोष होता. कितीही म्हटलं तर त्यांचा प्रवास अभावीप , टी डी पी असा करत काँग्रेस पक्षात आले होते.
पण हाय कमांड ने त ट्वेंटी सारखा विचार करून त्यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केलं ...
पण हाय कमांडणे मात्र राजकारणाचा क्रिकेट प्रमाणे विचार केला. टेस्ट मॅच वरून परिस्थिती आता टी ट्वेंटी वर गेलेली आहे. आउट करा किंवा आउट व्हा. असाच हिशोब आता तेलंगणामध्ये आहे हे ठामपणे सांगणाऱ्या रेवंथ रेड्डी वर विश्वास दाखवला. 2021 मध्ये त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आणि भाजीपाला सुरुवात झाली. तेलंगणा काँग्रेस उरलेली फक्त पाच आमदारांपुरती आणि बडे मासे बीआरएस च्या गडाला लागत होती. मग रेवंथ रेड्डी यांनी सिम्पल प्लान आखला. कॅल्क्युलेशन कम्युनिकेशन आणि एक्झिक्युशन . त्यांनी पहिली गोष्ट केली ती कम्युनिकेशनची त्यांनी काँग्रेसला तेलंगणात संघटना वाढवण्याची गरज होती .
कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभारायचं होतं आणि लोकांमध्ये काँग्रेस बद्दल अनुकूलता करायची होती. एकतर स्वतः रेवंथ रेड्डी यांचं वकृत्व भारी आहे. आपल्या भाषण शैलीने ते लोकांना आपल्यात करतातच पण लोकांच्या मुद्द्यांवर पण भाषणात हात घालायचे. मग मुद्दा के सी आर आणि बी आर एस यांनी केलेला भ्रष्टाचार चा असेल, कुटुंब शाही असेल किंवा राज्यात असलेली परिस्थिती. रेवंथ रेड्डी यांनी के सी आर टारगेट फिट केलं आणि त्यांचे विरोधात वातावरण तापवण्यास सुरुवात केली. त्यांचे आरोप आणि भाषण केसीआर यांना डॅमेज करत होते. आणि काँग्रेसची बाजू पक्की करण्यासाठी भारत जोडो चे कार्ड काम पक्क करून गेलं. भारत जोडो यात्रा गेले दोन आठवडे तेलंगणामध्ये होती. राहुल गांधी कित्येक लोकांना भेटले त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत राहिले. आणि आपली लढाई के सी आर यांचे विरुद्ध होत आहे अशी अधोरेखित होत गेली. आणि के सी आर यांना पर्याय म्हणून कोण पुढे येणार असं तेलंगणाच्या जनतेला समजलं ते म्हणजे काँग्रेस. पण हा कम्युनिकेशनचा पार्ट भारत जोडो यात्रे पुरता मर्यादित ठेवला नाही. निवडणुकीच्या प्रचारावेळीही त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही प्रचंड ऍक्टिव्ह केलं. तेलंगणामध्ये त्यांच्या सभा रॅली मोठ्या उत्साहात झाल्या.
आणि प्रत्येक वेळी रेवंथ रेड्डी यांचं नाव सीएम पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत येऊ लागलं. देवघर रेड्डी कॅल्क्युलेशन मध्ये चुकले नव्हते. तेलंगणामध्ये मुस्लिम मत पिक्चर फिरवू शकता. त्यात केसीआर आणि एम आय एम एकत्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला वाय एस आर काँग्रेस मुळे मत विभाजन होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्यांनी घेतला. मुस्लिम मतं आपल्याकडे वळविण्यासाठी मोहम्मद अझरुद्दीन हे फॅक्टर ठ रणार हे ओळखून त्यांनी त्याला ज्युब्ली हिल्स ह्या त्याच्या होम ग्राउंड वर उभं केलं.
त्यांनी के सी आर यांचे विरूद्ध त्यांनी कामा रेड्डी मधून फॉर्म भरला...
आपली लढाई ही के सी आर यांच्याविरुद्ध आहे हे नुसतं बोलून चालणार नाही तर खुद्द लढावं लागेल हे ओळखून त्यांनी के सी आर यांचे विरूद्ध त्यांनी कामा रेड्डी मधून फॉर्म भरला. थेट वन ऑन वन लढाई सुरू केली. आणि दोन टर्म तेलंगणाचे सुप्रीमो असलेल्या विरोधात आघाडीही मिळवली. पण नुसतं कागदावर स्ट्रॉंग राहून चालणार नव्हतं. एक्झिक्युशन चा पार्टही महत्त्वाचा होता. एक तर काँग्रेसने पूर्णपणे तेलंगणात आपली ताकद लावली होती.
रेवंथ रेड्डी यांना ह्यांनी साथ दिली या मोलाच्या कामगिरीत !
पण. काँग्रेसची बाजू सांभाळायला डी के शिवकुमार तळ ठोकून तेलंगणात होते. स्ट्रेटर्जी गणित सुनील कुनूगुलू हे लावत होते. माणिकराव ठाकरे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. पण या सर्वांना सांभाळून घेऊन रेवंथ रेड्डी यांनी डाव आखले. डावांवर काम केलं ही आणि डाव जिंकलेही.
"आक्रमक नेता आणि तरुणांचा पाठिंबा काँग्रेसला दिलेलं रिव्हायवल.ज्या के सी आर यांच्यापुढे कुठलेही लाट टिकत नव्हती. त्यांना वन ऑन वन धोबीपछाड देत. रेवंथ रेड्डी यांनी गेम फिरवला.आणि काँग्रेस कार्यालया बाहेर घोषणा ऐकायला आल्या"रेवंथ अण्णा सीएम सीएम". "!
रेवंथ रेड्डीतरी त्यांच्या या यशामागे तुम्हाला कोणती कारणं वाटतंय ते आम्हाला कमेंट मध्ये सांगावे आणि आमचा ब्लॉग अशाच पद्धतीने वाचत राहावे तुम्हाला नवनवीन गोष्टींची माहिती मिळण्यासाठी दररोज आमचा ब्लॉक वाचावा ही विनंती..
अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग वाचत राहा !
दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !
READ SPORTS RELATED NEWS.
READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.
READ ENTERTAINMENT RELATED NEWS.
READ AUTOMOBILE RELATED NEWS.
READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.