Weather Update: आज राज्यात सर्वाधिक तापमान 'या' शहरात; जाणून घ्या मुंबई आणि पुण्याचं आजचं तापमान

Table Of Contents [Less..]

     Maharashtra Weather Update today: राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत चाललंय आहे. राज्यातील बहुतांशी म्हणा किंवा सर्वच भागात किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जाणून घ्या, राज्यातील सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान.

    Weather Update: आज राज्यात सर्वाधिक तापमान 'या' शहरात; जाणून घ्या मुंबई आणि पुण्याचं आजचं तापमान
    Weather Update: आज राज्यात सर्वाधिक तापमान 'या' शहरात; जाणून घ्या मुंबई आणि पुण्याचं आजचं तापमान

    Maharashtra Temperature and Weather Update Today: महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात,  आंध्र प्रदेश,राजस्थान,  तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये अश्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून, या सर्व राज्यांचे सरासरी तापमान कमाल ४१ अंशांवर गेले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे तापमान ४४अंश सेल्सिअसवर गेल्याने तसेच जळगांव जिल्ह्यातील भुसावळ आणि जामनेरचे आजचे तापमान कमाल ४७ अंशापर्यंत होते त्यामूळे जळगाव हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरचे आजचे तापमान ४३.१अंश सेल्सिअस तर परभणीचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

    महाराष्ट्र राज्यात उन्हाचा चटका सर्वत्र चांगलाच वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागात हवामानाच्या अंदाजानुसार किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

    राज्यातील जिल्ह्यात नव्हे तर अनेक तालुक्यांच्या ठिकाणी कमाल तापमान ४० अंशा पर्यंत गेल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. हवेतील उष्मा वाढल्याने उकाडा ही जाणवत आहे. राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाचा तडाका चांगलाच वाढू शकतो तसेच राज्यात सरासरी तापमानातील वाढ कायम असण्याचा अंदाज आहे.

    महाबळेश्वर-माथेरानही तापू लागले -

    थंड हवेमुळे महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले रायगड जिल्हयातील महाबळेश्वर व माथेरानही तापले आहेत. पारा ३१ अंशांवर पोहोचला आहे. अंगातून घामाच्या धाराच धारा लागत आहे. उकाडा कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत माल विक्रीसाठी उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठा मांडव घातला आहे. सकाळी तापमान साडेअकरा ते चार वाजेपर्यंत ३४ अंश तर सध्याकाळी तापमान पाचनंतर सायकाळी २२ अंशापर्यंत जात आहे. तसेच,माथेरानचे सुद्धा तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.


    आजचं मुंबईत तापमान किती? 

    महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. ती वाढ तशीच दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईसह आणि उपनगरात आणि राज्यातील विविध शहरांत तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. आजचं मुंबईतील कुलाबा येथे तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर सांताक्रुझ येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

    आजचं पुण्याचं तापमान किती? 

    शुक्रवारी पुण्याचं तापमान किमान 37 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. बुधवारी आणि गुरुवारी पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानंतरही दुसऱ्या दिवशी तापमानाने चाळिशी पार केली आहे.

    महाराष्ट्र राज्यातील शुक्रवार रोजी प्रमुख शहराचं तापमान खालील प्रमाणे – 

    जळगाव - ४४ अंश सेल्सिअस

    छत्रपती संभाजीनगर -४२.४ अंश सेल्सिअस

    बीज- ४२.४ अंश सेल्सिअस

    पुणे - ३७ अंश सेल्सिअस

    रत्नागिरी - ३४.६ अंश सेल्सिअस

    सोलापूर -४२.४ अंश सेल्सिअस

    परभणी -४१.४ अंश सेल्सिअस

    महाबळेश्वर - ३४ अंश सेल्सिअस

    कुलाबा -३२ अंश सेल्सिअस

    सांताक्रुझ -३४ अंश सेल्सिअस

    उदगीर -३९.० अंश सेल्सिअस

    सातारा - ३४ अंश सेल्सिअस

    धााराशीव - ३९ अंश सेल्सिअस

    कोल्हापूर - ३२ अंश सेल्सिअस

    नाशिक -३८ अंश सेल्सिअस




    Comments Informations