जळगावात ही हिट अँड रन प्रकरणं; आई सह तीन मुलं जागीच ठार| hit and run case in Jalgaon:आपण सर्व पुण्यातील हिट अँड रन प्रकरणं विविध वृत्त वाहिन्यांच्या चॅनल वर पाहत आहोत. पण त्या आधी जळगांव मध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे.
![]() |
| जळगावात ही हिट अँड रन प्रकरणं; आई सह तीन मुलं जागीच ठार| hit and run case in Jalgaon |
पुण्या प्रमाणेच जळगांव मध्ये पण ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण; गेला 4 निष्पापांचा बळी
टीव्ही9 मराठी च्या वृत्तानुसार,हे प्रकरण 17 दिवसाआधी घडले. बिल्डर आणि नेत्याच्या मुलाने चार चाकी गाडीने उडवून चार लोकांचा आई सह तीन मुलांचा मृत्यु झालेला आहे. धडक देणाऱ्या गाडीतून गांजाही जप्त झालेला आहे.परंतु 17 दिवस उलटूनही आरोपीचे ब्लड रिपोर्ट अजूनही आलेले नाही आहेत. या प्रकरणावर जळगांव चे नेतेही गप्प आहेत.पुण्या प्रमाणेच जळगावमध्ये पण सामान्य जनता पोलिस प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहे.
जळगावात ही हिट अँड रन प्रकरणं; आई सह तीन मुलं जागीच ठार| hit and run case in Jalgaon:पुण्यातील drunk and drive प्रकरण देश भर गाजतय माञ असाच प्रकार काही दिवसापूर्वी जळगांवात सुद्धा घडला.
त्यात सुद्धा जळगांव मध्ये पण पुण्याप्रमानेच बऱ्यापैकी साम्य आहे. इथेही दुचाकीला धडक देणारा बिल्डरचा आणि राजकारण्याचा मुलगा आहे. राजकीय आशीर्वादामुळे या प्रकरणात पोलिसांनी कसूर केल्याचा या ठिकाणी आरोप होतोय.
नेमकं प्रकरणं कसे घडले?
आधी नेमक काय घडलं ते पाहूया, दुर्घटना घडली 7 मे 2024 ला, राणी चव्हाण नावाच्या आशा स्वयंसेविका इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या. दुचाकीवर त्यांच्या सह 7 आणि 3 वर्षाची 2 मुलं आणि त्यांच्या सह 16 वर्षाचा एक त्यांचा भाचा होता. जळगाव च्या रामवाडी जवळ एका कारने दुचाकीला धडक दीली. यात राणी चव्हाण यांच्या सोबत आसलेल्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.
टीव्ही9 मराठी या वृत्त वहिनीला मिळालेल्या माहितनुसार, ज्या कारने धडक दिली त्यातील एक जण अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे. दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर आरोपी पण जखमी झालेले आहेत. याच कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबई येथील रुग्णालयात ऍडमिट केलेले आहेत. अपघातावेळी कारमधील कारचालक आणि इतर लोक दारूच्या नशेत होते.
बघा संपूर्ण रिपोर्ट या व्हिडिओ मध्ये,
आजुन ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडला आहे. माञ गाडीत गांजा सापडल्याची कलम उशिरा लावण्यात आली. शिवाय या प्रकरणातही पुण्याप्रमानेच अपघाताला 17 दिवस होऊनही आरोपींचे ब्लड रिपोर्ट अद्याप आलेले नाहित.
संबंधित दुर्घटनेवेळी हजर असलेले म्हणतात, अपघात करणारे पुर्ण नशेत होते. अपघात वेळी बाकीचे पळून गेले. माननिय आव्हाड साहेब यांच्या सामोरं गांजा गाडीत दिसला आणि तशी कलम लावली. परंतू आजुन तपास लागलेला नाही.
पोलिस प्रशासन यावर उत्तर देताना म्हटले की, सदर अपघातामध्ये तीन बालके आणि एका महीलेचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने या प्रकरणाचे गांभीर्य पाहता आपण सदोष मनुष्यवधाचा सेक्शन आपण लावले.तसेच गाडीमध्ये 10 ग्रॅम गांजा मिळून आला होता.त्यामूळे एन डी पी ए च सेक्शन सुद्धा आपण लावले आहे. दोन आरोपी फिर्यादी मध्ये नमूद केल्या प्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले होते.या कारणास्तव त्यांना आता पर्यंत अटक करण्यात आलेलं नाही.आरोपी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होताच त्यांना पण अटकेची कारवाई केली जाईल. व त्याचे रक्ताचे नमुने काढण्यात आलेले आहेत.
सोशल मीडियावर आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळणे बंद झाले का? हे ट्विट पहा 👇
सोशल मीडियावर आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळणे बंद झाले का? 👇
— Pawan/पवन (@thepawanupdates) May 23, 2024
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात जळगाव पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
चार जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयितांमध्ये बिल्डर… pic.twitter.com/978qdN2gRb
जळगावात ही हिट अँड रन प्रकरणं; आई सह तीन मुलं जागीच ठार| hit and run case in Jalgaon
याप्रकरणात पुणेकर यांच्या प्रमाणेच जळगांवकर यांना एक प्रश्न पडलाय की, ब्लड रिपोर्ट यायला 17 दिवस लागतात का? आणि या प्रकरणात राजकीय दबाव तर नाहि ना?
.webp)