RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
देशभरातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागलेत. राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्तापालटाची परंपरा कायम ठेवलीये. राजस्थानच्या गेल्या ६ विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर एक नजर टाकली तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की गेल्या प्रत्येक निवडणुकीत राजस्थानी मतदारांनी भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्तेत बसवलंय.
यावेळीही राजस्थानच्या मतदारांनी ही परंपरा पाळलीये. भाजपला सुरुवातीपासून राजस्थानमध्ये विजयाचा आत्मविश्वास होता. एक्झिट पोलमध्येही भाजपला बहुमत मिळण्याचेच अंदाज वर्तवण्यात आले होते. पण राजस्थानमध्ये भाजपला एवढा मोठा विजय मिळवणं कशामुळे शक्य झालं. राजस्थानमध्ये काँग्रेस नेमकी कुठे कमी पडली एकूणच राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे या जाणून घेऊ संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉग मध्ये सविस्तर पाहूयात.
पहिले कारण :गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत मतभेद अनेकदा राजस्थान मधील चर्चेचा विषय राहिला.
काँग्रेसला राजस्थानमध्ये सर्वात जास्त बॅक फुटला घेऊन जाणारी गोष्ट ठरली ती म्हणजे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधील अंतर्गत संघर्ष. गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत मतभेद अनेकदा राजस्थान मधील चर्चेचा विषय राहिला. पायलट यांनी काही महिन्यांपूर्वी वसुंधरा राजे यांनी मागच्या सरकारमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गेहलोत हे काहीही पाऊल उचलत नाही असा घणाघाती आरोप केला होता. यासाठी त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता. अशोक गेलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये सन 2018 पासूनच म्हणजेच काँगेस ने विधानसभा निवडणूक जिंकल्या पासून मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू झाला होता. मात्र दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गेहलोत यांच्या नावावर हाय कमांडने केला होता. तर पायलट यांना उपमुख्यमंत्री पद हे दिलं होतं. त्यानंतर २०१९च्या जुलै महिन्यात गेहलोत यांच्या विरोधात पायलट यांचे 19 आमदार दिल्लीमध्ये गेले होते. यामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात गेलं होतं. आणि कॅबिनेटमध्ये त्यांचे समर्थक असलेले विश्वेद्रसिंह आणि रमेशचंद्र मीना यांची पद देखील काढून घेतली होती. त्यानंतर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील पुन्हा या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. थोडक्यात पक्षातील नेत्यांमुळे सरकार वर शंका उपस्थित आल्याने मतदारांमध्ये काँग्रेस बद्दलचा अविश्वास आला होता. याच अविश्वासाचा रूपांतर काँग्रेसच्या पराभवामध्ये झालं .
दुसरे कारण :भाजपचा राजस्थानमध्ये जोरदार प्रचार...
त्यानंतर दुसरे कारण म्हणजे भाजपचा राजस्थानमध्ये जोरदार प्रचार भाजपने राजस्थानमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे मिळून चार रोड शो आणि बारा सभा आयोजित केल्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी अशोक गेहलोत यांच्या जोधपुर मध्ये सुद्धा प्रचंड रॅली आणि राजस्थानच्या बिकानेर मध्ये मेगा रोड शो घेतल्यामुळे राजस्थानच्या निकालावर मोठा फरक पडला. तर स्वतः अमित शहा यांनी राजस्थानमध्ये सलग तीन दिवस व्यापक प्रचार केला होता. मोदी आणि शहा यांनी राजस्थानचे राजधानी असलेल्या जयपुर मध्ये रोड शो घेतले होते. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राजस्थानमध्ये जाऊन जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे भाजपकडून मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रचारामुळे हया निकालावर पडला असे म्हटले जाते.
तिसरे कारण :अँटी इन्कंबन्सी
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे अँटी इन्कंबन्सी चा काँग्रेसला फटका बसला..
प्रत्येक पक्षाला राजकारणात ऑंटी इन्कंबन्सीचा फटका बसत असतो. तसा तो राजस्थानमध्ये काँग्रेसला देखील बसला. "राजस्थान मध्ये जवळपास 80 विधानसभा क्षेत्रांमध्ये अँटी इन्कंबन्सीचा फटका बसू शकतो.!"असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे 33 मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केला. पण बाकी मतदारसंघांमध्ये गेहलोत सरकारने पुन्हा त्याच उमेदवार यांना संधी दिल्यामुळे याचा मोठा परिणाम निकालावर झाला. याशिवाय अशोक गेहलोत हे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले. नवीन नेतृत्वाला संधी न दिल्यामुळे काँग्रेसला फटका बसला असं म्हणता येतं.
चौथे कारण : काँग्रेसने मोठी मोठी आश्वासन दिली मात्र ती पूर्ण केली नाही.
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
सरकारने अनेकदा नवनवीन योजनांची घोषणा सुद्धा केली त्या योजना काही अस्तित्वात आल्या नाहीत. एक तर भ्रष्टाचारामुळे त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. किंवा गेहलोत सरकार कडूनच या योजनांची अंमलबजावणी करण्यात निष्काळजीपणा करण्यात आला. गेलोत सरकारकडून एक पॉईंट पंचवीस कोटी महिलांना स्मार्टफोन देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात वीस ते पंचवीस लाखच फोन देण्यात आले होते. याशिवाय बेरोजगारी भत्ता योजना या योजनेमध्ये सुद्धा गेहलोत सरकारचा निष्काळजीपणा पाहन्यात आला. याच कारणाने राजस्थानची जनता गेहलोत सरकार विरोधात गेली.
पाचवे कारण :कन्हैयालाल हत्याकांडाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
28 जून 2022 मध्ये कन्हैयालाल या शिवण कामगार करणाऱ्या व्यक्तीचा त्याच्याच दुकानात घुसून दोन मुस्लिम व्यक्तींनी गळा कापून हत्या केली होती. कन्हैया लाल ने नुपूर शर्माच्या मुस्लिमप्रेषित यांच्या विरोधी पोस्टवर सोशल मीडियावर समर्थन पोस्ट केली होती. याच कारणाने दोन मुस्लिम व्यक्तींनी कन्हैयालाल यांच्या दुकानात जाऊन त्यांची हत्या केली होती. आणि ही हत्या करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणामुळे विरोधकांनी गेहलोत सरकारला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारादरम्यान कन्हायालाल प्रकरण उकरून काढत गेहलोत सरकारला फक्त त्यांच्याच पडलेला आहे असा आरोप देखील त्यांनी केला. गेह लोत सरकार राहिल्यास तालिबानी आणि आतंकवादी घटना घडतच राहतील असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केल होत.त्यामुळे कन्हैयालाल प्रकरणाचा फटका काँग्रेसला बसला असं सांगण्यात येत आहे.
जाणून घ्या अजून :
Telangana Result2023: KCR यांच्या साम्राज्याला धक्का देणाऱ्या Congress Leader Revanth Reddy यांचा इतिहास काय ?
सहावे कारण :काँग्रेसने 15 ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना संधी दिल्याने चुकीचा संदेश गेला..
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
कन्हैयालाल हत्याकांडानंतर राजस्थान मध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष निर्माण झाला होता. याच काळात विरोधकांनी काँग्रेस सरकार हे मुस्लिम धार्जिन असल्याचा आरोप सुद्धा केला होता. त्यामुळे राजस्थानमधील जनता काँग्रेस विरुद्ध जायला सुरुवात झाली होती. त्यातच काँग्रेसने या निवडणुकीत 15 ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले. तर भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. या उलट भाजपने चार ठिकाणी धर्मगुरूंना संधी देऊन हिंदू वोटबँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस हिंदू मतदारांकडे दुर्लक्षित करत असून मुस्लिम मतदारांना अधिक महत्त्व देत असल्याचा संदेश गेला. ज्यामुळे हिंदू वोटबँक काँग्रेसच्या विरोधात गेली.
सातवे कारण :पेपरलीक बेरोजगारीमुळे तरुण मतदार वर्ग काँग्रेसच्या विरोधात गेला.
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
राजस्थानमध्ये मागील पाच वर्षात सतरा वेळा पेपर लीक झाल्याची माहिती आहे. त्यातच पैसे देऊन नोकरी देण्याच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले होते. राजस्थानमध्ये 18 ते 21 वयोगटातील तरुण मतदारसंख्या जवळपास 66 लाख आहे. मात्र वारंवार होणारे पेपर लीक घटना आणि नोकऱ्यांमध्ये होणारे भ्रष्टाचार आणि सरकार करून यामध्ये काहीं न होणारी कारवाई. याचमुळे संपूर्ण तरुण वर्ग काँग्रेसच्या विरोधात गेला.याशिवाय भाजपने देखील पेपरलीक आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला. याचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसला.
आठवे कारण : जातीय समीकरणे काँग्रेसच्या विरोधात गेली.
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
राजस्थान मध्ये जाट ,गुज्जर आणि राजपूत या तीन जातींचे वर्चस्व आहे. याच विषयाचा विचार करून वसुंधरा राजे यांनी विचार करून यांनी मी जाट समाजाची सून राजपूत समाजाची कन्या आणि गुज्जर समर्थक असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. तर दुसरीकडे काँग्रेसने काँग्रेसचे सचिन पायलट यांना डावलून गुज्जर गुर्जर समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदावर न बसवणे त्यानंतर उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेश काँग्रेसच्या पदावरून हटवणे यामुळे गुज्जर समाज हा काँग्रेस विरोधात आक्रमक झाला होता. त्यामुळे गेहलोत असताना गुज्जर समाजाचे सचिन पायलट कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. असा मेसेज देखील समाजात गेला होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला हे पाहायला मिळाल.
नववे कारण :राजस्थान मधील महिला अत्याचार आणि गुन्हेगारीला आळा न बसने हे काँग्रेसचे अपयश..
त्यानंतर महिलांवरील अत्याचारांमध्ये राजस्थान आघाडीवर होते तो काळ म्हणजे 2021. सन 2021 मध्ये 31 हजार 224 महिला अत्याचारांच्या केस देशांमध्ये होत्या. यातील 6377 घटना एकट्या राजस्थानमधील होत्या. या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक होत्या मात्र ही आकडेवारी आल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी याकडे नाकारले. राजस्थान मधील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याकडे कोठे असण्याचा आरोप करत झटकण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री यांनी देखील या आकड्या बाबत विशेष काही खेद व्यक्त केला नाही. याच मुद्द्याचा उल्लेख माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सभेत राजस्थानमध्ये वारंवार केला. "काँग्रेसने राजस्थानमध्ये महिला अत्याचारांची परंपराच बनवली आहे."गुन्हेगारी दंगली दलित आणि अत्याचार आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार यामध्ये राजस्थान अव्वल आहे." असा आरोप त्यांनी चित्तोडगढ सभेत त्यांनी केला केला. हा एक सुद्धा मुद्दा काँग्रेसच्या पराभवास कारणी ठरला.
दहावे कारण :बंडखोरी शमविण्याचा गेहलोत यांच्या कडून प्रयत्न झाला नाही .
त्यानंतर दावा म्हणता म्हणजे काँग्रेसमधील बंडखोरीला शमविण्याचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडून प्रयत्न केला गेला नाही.. राजस्थानमध्ये अनेकदा काँगेस बंडखोरी समोर आलेली होती. जुलै 2020 मध्ये काँग्रेस गटातील 19 आमदार गेहलोत यांच्या विरोधात दिल्लीत गेले होते. त्यामुळे पाहिला त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री पदावरून आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यांचे समर्थक असलेले कॅबिनेट मंत्री यांचे सुद्धा मंत्रिपदे काढून घेण्यात आली होती. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या समर्थक. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यावर अधिक आक्रमक झाले होते. मात्र गेहलोत यांनी सचिन पायलट आणि त्यांचे सोबत असलेले बंडखोर आमदार यांना समजावून आपल्या पारड्यात आणले नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांनी कित्येक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत देखील आमदारांनीही पक्षाचे विजयासाठी भरपूर असे प्रयत्न केले नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला खूप मोठा फटका बसला
राजस्थानमध्ये अनेकदा काँगेस बंडखोरी समोर आलेली होती. जुलै 2020 मध्ये काँग्रेस गटातील 19 आमदार गेहलोत यांच्या विरोधात दिल्लीत गेले होते. त्यामुळे पाहिला त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री पदावरून आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यांचे समर्थक असलेले कॅबिनेट मंत्री यांचे सुद्धा मंत्रिपदे काढून घेण्यात आली होती. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या समर्थक. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यावर अधिक आक्रमक झाले होते. मात्र गेहलोत यांनी सचिन पायलट आणि त्यांचे सोबत असलेले बंडखोर आमदार यांना समजावून आपल्या पारड्यात आणले नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांनी कित्येक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत देखील आमदारांनीही पक्षाचे विजयासाठी भरपूर असे प्रयत्न केले नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला खूप मोठा फटका बसला असं म्हणता येतय..
अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग (https://mynewseasy.blogspot.com/)
वाचत राहा !
दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !
READ SPORTS RELATED NEWS.
READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.
READ ENTERTAINMENT RELATED NEWS.
READ AUTOMOBILE RELATED NEWS.
READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.

